Melghat : महिला व बालकल्याण विभागात 800 कोटींच्या महाघोटाळ्याची चौकशी करा : MP Navneet Rana
प्रणय निर्बाण, एबीपी माझा
Updated at:
13 Aug 2021 07:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचं कुपोषणाच्या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. खासदार नवनीत राणा यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांना प्रत्यक्ष भेटून महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आदिवासी शिशुंना शासनातर्फे देण्यात येणारा पौष्टिक आहार आणि अन्य आवश्यक वस्तू न मिळाल्यामुळे गेल्या तीन महिन्यात मेळघाटात 49 नवजात शिशुंचा मृत्यू झाल्याचा खासदार नवनीत राणाने तक्रार केली.