Water Crisis: 'सिडको चोर आहे, पाणी विकतंय', Panvel मध्ये ऐन दिवाळीत रहिवासी पाण्याविना Special Report
Continues below advertisement
पनवेल (Panvel) परिसरात सिडकोच्या (CIDCO) नियोजनशून्य कारभारामुळे लाखो रहिवासी पाण्यापासून वंचित आहेत, ज्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात त्यांचे हाल झाले. 'जो पर्यंत हा पाणीपुरवठा अॅडिशनल येत नाही तोपर्यंत नवीन सीसी, नवीन ओसी द्यायचं बंद करा', अशी थेट मागणी आमदार प्रशांत ठाकूर (MLA Prashant Thakur) यांनी केली आहे. खारघर (Kharghar), तळोजा (Taloja), कामोठे आणि उलवे (Ulwe) यांसारख्या नोड्समध्ये परिस्थिती गंभीर असून, कोट्यवधींचे प्रकल्प उभारणाऱ्या सिडकोला नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात अपयश आल्याचा आरोप होत आहे. एकीकडे पंतप्रधान आवास योजनेतील (Pradhan Mantri Awas Yojana) घरांना पाणी नाही, तर दुसरीकडे खाजगी बिल्डरांना पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. या समस्येमुळे मनसेनेही (MNS) सिडकोला पायाभूत सुविधांवर आधी लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. पाणी नसल्याने संतप्त नागरिकांनी सिडकोच्या आगामी लॉटरीकडे पाठ फिरवल्यास आश्चर्य वाटायला नको, असे चित्र आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement