Praniti Shinde vs Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, प्रणिती शिंदेंची मागणी
Continues below advertisement
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 'महिलांना संरक्षण देण्याऐवजी मुख्यमंत्री महिला खासदारांवर टीका करण्यात वेळ घालवतात, त्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे', असे वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केले. शिंदे यांनी आरोप केला आहे की, अनेक महिला डॉक्टरांवर राजकीय दबाव टाकून चुकीचे रिपोर्ट देण्यास भाग पाडले जाते. या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून, शिंदे यांच्या मागणीला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका २९ वर्षीय महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे. या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकासह दोघांना अटक करण्यात आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement