Nager Panchayat Election 2021 : OBC आरक्षणाशिवाय निवडणूक,वर्चस्वासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

राज्यातल्या ३२ जिल्ह्यांतल्या १०५ नगरपंचायती, भंडारा, गोंदिया या दोन जिल्हा परिषदा आणि त्यातील पंचायत समित्यांसाठी आज मतदान होतंय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक होतेय. दोन टप्प्यांत होणाऱ्या या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील वर्चस्वासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ओबीसी आरक्षित असलेल्या जागांवर आता खुले प्रभाग म्हणून १८ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १९ जानेवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. आज सकाळी ७.३० वाजल्यापासून हे मतदान होतेय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola