MCA Elections: '१५६ क्लब्सचं सदस्यत्व रद्द करा', श्रीपाद हळबेंच्या आक्षेपाने MCA निवडणुकीत मोठा ट्विस्ट!

Continues below advertisement
मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association) म्हणजेच एमसीएच्या (MCA) कार्यकारिणीची १२ नोव्हेंबरला होणारी त्रैवार्षिक निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एमसीएला संलग्न फ्रेंड्स क्रिकेट क्लबचे सचिव श्रीपाद हळबे (Shripad Halbe) यांनी 'एमसीएला संलग्न २१३ मैदान क्लब्सपैकी १५६ मैदान क्लब्सची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झाली नसल्यामुळे या १५६ क्लब्सचं सदस्यत्व रद्द करून त्यांना आगामी निवडणुकीत मतदान करण्यापासून किंवा निवडणूक लढवण्यापासून रोखावे', अशी मागणी केली आहे. हळबे यांनी निवडणूक अधिकारी जयेश सहारिया (Jayesh Sahariya) यांना पत्र पाठवून हे आक्षेप नोंदवले आहेत. त्यांनी मार्च महिन्यातील क्लब्स आणि त्यांच्या प्रतिनिधींची यादी ग्राह्य धरण्याची मागणी केली आहे. या दाव्यामुळे ऐन दिवाळीत एमसीएच्या निवडणुकीत मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola