Navi Mumbai Fire: कामोठेमध्ये सिलेंडरचा स्फोट, घरात झोपलेल्या माय-लेकीचा होरपळून दुर्दैवी मृत्यू!

Continues below advertisement
नवी मुंबईतील कामोठे (Kamothe) येथील अंबेश्रद्धा सहकारी सोसायटीमध्ये (Ambeshraddha Sahakari Society) मंगळवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत आई आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक अंदाजानुसार, घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली असावी असे अग्निशमन दलाने म्हटले आहे. ही दुर्घटना सेक्टर ३६ मधील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका घरात घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी रहिवाशांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत घरातील दोन महिलांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे कामोठे परिसरावर शोककळा पसरली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola