Navi Mumbai Fire: 'फटाके-सिलिंडरबाबत खबरदारी घेण्याची वेळ', नवी मुंबईतील अग्नितांडवानंतर नागरिकांना इशारा
Continues below advertisement
नवी मुंबईतील (Navi Mumbai) वाशी (Vashi) आणि कामोठे (Kamothe) येथे दिवाळीच्या दिवशी आगीच्या दोन मोठ्या दुर्घटना घडल्या, ज्यात एकूण सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले. प्रतिनिधी विनायक पाटील यांच्या माहितीनुसार, 'फटाके असतील किंवा सिलिंडर, घरामध्ये जे लाईटिंग आपण लावलेली आहे, त्याबाबतीत आता खबरदारी घेण्याची वेळ आली आहे.' वाशीतील सेक्टर १४ मधील एमजी कॉम्प्लेक्समध्ये (MG Complex) शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला. ही आग दहाव्या मजल्यावर लागून बाराव्या मजल्यापर्यंत पसरली. मृतांमध्ये एका वृद्ध महिलेसह एकाच कुटुंबातील आई, वडील आणि त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. तर दुसरीकडे, कामोठे येथील श्रद्धा सहकारी सोसायटीत सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत आई आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनांमुळे सणासुदीच्या काळात अग्नी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement