Ajit Pawar 'Who Parrikar?': पुण्यात Traffic वरून महिलांचा संताप, Ajit Pawar यांची कोंडी
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पुणे (Pune) दौऱ्यात त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पुण्यातील मुंढवा (Mundhwa) भागात पाहणी दौऱ्यावर असताना एका महिलेने वाहतूक कोंडी (Traffic Congestion) आणि इतर समस्यांची यादीच वाचून दाखवली. यावेळी महिलेने गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचा उल्लेख करत, "परीकर साहेब जसे अननोन कधीतरी टाईम न सांगता विजीट करीत असत, तसे तुम्हीही ट्राफिक टाईममध्ये यायला पाहिजे," असे म्हटले. यावर अजित पवारांनी "परीकर कोण?" असा प्रश्न विचारला. मुंढवा-केशवनगर (Keshavnagar) परिसरातील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त आहेत. ही समस्या केवळ एका भागाची नसून, वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्याच्या (Pune) अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. वाहतुकीसोबतच पाणीपुरवठा (Water Supply) आणि बिल्डरांकडून (Builders) सुविधा न पुरवल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या. अजित पवारांनी तात्काळ पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून घटनास्थळी येण्याच्या सूचना दिल्या. पुणेकरांचा संताप आता सहनशीलतेच्या पलीकडे गेला असून, पालकमंत्री म्हणून अजित पवार या समस्यांवर तोडगा काढणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement