TOP 100 Headlines : 07 Oct 2025 : Maharashtra News Updates : Superfast News : ABP Majha
Continues below advertisement
आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले, मात्र या सोहळ्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बहिष्कार टाकला. विमानतळाला 'दिबा पाटील' यांचे अधिकृत नाव नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. संजय राऊत यांनी 'दिबा पाटील' यांचे नाव हा भूमिपुत्रांचा सन्मान असल्याचे म्हटले, तर नवनाथ बन यांनी राऊतांवर पलटवार करत भूमिपुत्रांवर बोलण्याचा अधिकार गमावल्याचे सांगितले. काँग्रेसने अपूर्ण कामाचे उद्घाटन निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्याची टीका केली. दुसरीकडे, अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदतीच्या मागणीसाठी ठाकरे शिवसेनेने राज्यभर आंदोलन केले. या आंदोलनाला भाजपने 'नौटंकी' म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात मराठा आरक्षणाच्या भूमिकेवरून नाराजी नाट्य रंगले. "छगन भुजबळ बावसळयात मराठ्यांच्या पोरांचं कसं वाटोळं होईल याची ते वाट पहात आहेत," अशी टीका जरांगे यांनी केली. बंजारा समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी धाराशिवमध्ये भव्य मोर्चा काढला. सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून, सोन्याचा भाव प्रति तोळा एक लाख पंचवीस हजारांच्या पार गेला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement