National Highway Work : महामार्गांच्या कामात 'स्पीडब्रेकर'; रस्ते वाहतूक मंत्रालयाचं स्फोटक पत्र

Continues below advertisement

 महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग बांधणीच्या कामांत लोकप्रतिनिधी अडथळा आणत असल्याचा मुद्दा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रामुळे गाजला होता. आता महाराष्ट्रातल्या रस्ते विकासात अडथळा ठरणारा आणखी एक मुद्दा दुसऱ्या एका पत्रामुळे समोर आलाय.. रस्ते वाहतूक मंत्रालयाचे संचालक राजेश गुप्ता यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अध्यक्षांना लिहिलेलं हे स्फोटक पत्र एबीपी माझाच्या हाती लागलंय. रस्त्यासाठी जमीन अधिग्रहणात अपील करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना महसूल अधिकारी कृषी जमिनीच्या किंमतीपेक्षा ७ ते २७ पट अधिक मोबदला देत असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय. आणि हा भरमसाठ मोबदला द्यायचा झाला तर ३ हजार कोटींची अधिक रक्कम द्यावी लागेल आणि त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात काम करणं शक्य होणार नाही, असं या पत्रात नमूद करण्यात आलंय. या पत्राबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारशी काही महिन्यांपूर्वी संपर्क साधला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram