Nashik UnSeasonal Rain | नाशिकमध्ये अवकाळीचा फटका, फळबागांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल
Nashik UnSeasonal Rain | नाशिकमध्ये अवकाळीचा फटका, फळबागांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल
- अवकाळी पावसाचा फटका... - काढणीला आलेला कांदा, कांदा रोप, मक्याचे नुकसान.. - कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत नाशिक जिल्ह्यातील येवला, सिन्नर ,निफाड, देवळा आदी भागामध्ये अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाच मोठे नुकसान झाले आहे..नाशिकच्या येवल्यातील पारेगाव या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी जनार्दन कोराळे यांच्या शेतातील लावणी योग्य झालेले कांदा रोप भुईसपाट झाले आहे..या पावसामुळे काढणीला आलेला कांदा, मका यांचे मोठे नुकसान झाले आहे... मुंबईत एकीकडे राजकीय घडामोडी गतिमान होत्या, सरकार स्थापनेची लगभग सुरू होती आणि दुसरीकडे बळी राजावर नैसर्गिक संकट कोसळलेल होतं, अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा नाशिक मधल्या शेतकऱ्याच कंबरड मोडलेल आहे. नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू आहे आणि यामुळे कांदा, द्राक्ष, भाजीपाला अशा वेगवेगळ्या पिकांना याचा फटका बसतोय. आपण आता नाशिक तालुक्यातल्या बोराडे यांच्या काकडीच्या बागेमध्ये आहोत आणि आपण बघतोय की संपूर्ण बाग म्हणजे इथून गेल्या आठ ते दहा दिवसापासून रोज बाजारामध्ये यांची काकडी जात होती परंतु आता अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे काकडीचे रोप हे खराब झालेले आहे त्याचबरोबर कांदा पिकाला देखील याचा फटका बसलेला आहे आणि हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून घेतलेला आहे. अवकाळी पावसाचा जोरदार फटका यांच्या शेताला बसलेला आहे. दादा काय परिस्थिती आहे सध्या काय काम चालू आहे पाऊसा. वजन झाला रात्री खूप पाऊस झाला त्याच्यामुळे सगळे झाड खाली पडले म्हणजे बांधायच काम चालू होतं पण मग ते अचानक पाऊस आला वाटत नव्हता पाऊस होईल त्याच्या सगळे झाड खाली आता वरती बांधाच काम चालू आहे वजन झा खाली गेले पण मग हे पान वगैरे खराब दिसताय काय परिणाम जाणवतोय हे काल परवाच्या पावसामुळे झाले हे काय झालं पाऊस झाला काकडीच्या पानाला बारीक असे काटे असता ते पाणी पकडून ठेवत आणि पाणी पकडून ठेवल्यानंतर कुठल्या पिकाला फटका बसलेला आहे? आता माझ्याकडे तर हे काकडी आणि बाहेर कांद्याच रोप टाकलय तर कांद्याच रोप टाकल तर कांद्याच्या रोपात सुद्धा पाणी साचलेल असते वाफ्यांमध्ये पहिले चिताचा पाऊस झाला त्याच्यामुळे रोप पातळ झाले आम्ही डबल रोप टाकले आता या अशान टाकले का आता वातीवरून चांगलं होईल पण मग परत पाऊस झाल्यामुळे ते आता रोप आता पाण्यामध्ये आहे पाणी बऱ्यापैकी आता बघू आता दोन दिवस झाले पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि नवीन सरकारचा तिकड शपथवी चालू आहे आता त्यांना आम्ही भरघवस मध त्यांनी दिलंय निवडून एक हाती सत्ता दिली तर त्यांनी आता काही प्रमाणात पाणी कमी झाले मात्र ज्या वेल आहेत हे वेल सगळे खाली पडलेले होते, वजन वाढलेलं होतं आणि त्यामुळे खाली पडलेला माल हा आता या शेतकऱ्याला फेकून देण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत कृषी अधिकारी कर्मचारी यांच्या शेताच्या बांधावर यावेत आणि यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई ही तात्काळ मिळावी हीच अपेक्षा या शेतकरी राजाकडन व्यक्त केली जाते.