Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

Continues below advertisement

Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज शपथ घेतली. मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा आले आणि मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. मात्र, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद गेले, त्यांना उपमुख्यमंत्रीपदी शपथ घ्यावी लागल्याने आधीच शिवसेना नेते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यात, आजच्या शपथविधी सोहळ्यात योग्य मान-सन्मान न झाल्यावरून शिवसेना (Shivsena) शिंदे गट नाराज झाला आहे. शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. मात्र, आज लगेच पहिल्या दिवशी मी तक्रार करणार नाही, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, आजच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीयमंत्री, भाजपचे दिग्गज नेते, वरिष्ठ नेते, सेलिब्रिटी, उद्योगपती यांची मोठी गर्दी होती. याशिवाय आमदार, खासदार आणि महायुतीचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने आझाद मैदानावर उपस्थित होते. 

मुख्यमंत्रीपदाच्या आजच्या शपथविधी सोहळ्यात नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता. सगळे मुख्य नेते मागे बसले होते, तिन्ही पक्षात पासेस येणार होते, ते आले पण थोडाफार ढिसाळपणा जाणवल्याचे पावसकर यांनी म्हटलं. मुख्य स्टेजवर आमचे एक केंद्रीय मंत्री होते . पण, पक्षाची नेतेमंडळी पण असती तर बरं झालं असतं. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होतं की, आपला नेता का नसावा व्यासपीठावर, काही नेते जायला हवे होते स्टेजवर, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, राज शिष्टाचार प्रशासनाकडूनही कळत नकळत चूक झाली आहे. त्यामुळे, दखल तर घ्यावी लागेल, पण आज लगेच पहिल्या दिवशी आपण तक्रार करणार नाही, असेही पावसकर यांनी म्हटले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram