Nashik ST Worker Strike: 36 कर्मचारी पुन्हा संपात सहभागी ABP Majha
एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, आजपर्यंत अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे मात्र दुसरीकडे 20 दिवस उलटून देखिल हा संप मागे घेण्यात आलेला नसून नाशिकमध्ये तर शनिवारी कामावर रुजू झालेले 36 कर्मचारी कालपासून पुन्हा गैरहजर झाल्याने काल नाशिक विभागात एकही बस रस्त्यावर धावू शकलेली नाही. आज सकाळपासून देखील महामंडळाची एकही बस आगारातून बाहेर पडलेली नसून बससेवा पूर्ण ठप्प झाली आहे.