Nashik Sanjay Raut Full PC : अजित पवारांना सुद्धा ईडीने छळले, पण आता भाजपसोबत गेल्याने शांत झोपतात

Continues below advertisement

Nashik Sanjay Raut Full PC : अजित पवारांना सुद्धा ईडीने छळले, पण आता भाजपसोबत गेल्याने शांत झोपतात

मुंबई: भाजपविरोधात (BJP) आवाज उठवणाऱ्यांविरोधात ईडीचा (ED) फास आवळला जातोय. संपूर्ण महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) रोहित पवारांसोबत (Rohit Pawar)  आहे, असे वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut)  केले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar)  देखील टोला लगावला आहे.  अजित पवारांचा ईडीने छळ केला, मात्र आज त्यांना शांत झोप लागते कारण ते भाजपसोबत आहे,असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.  

ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणा या स्वतंत्र राहिल्या नाहीत. या भाजपचा शाखा झाल्या आहेत. लोकशाहीच्या रक्षणासाठी उभे राहिले त्यांच्या विरोधात यांचा वापर होतो. जे लोक भाजपच्या वॉशिंग मशीनमधे सहभागी होतात ते सुटतात, इतरांना त्रास दिला जातो. अजित पवारांचा ईडीने छळ केला, मात्र आज त्यांना शांत झोप लागते कारण ते भाजपसोबत आहे,असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram