Nashik Sakal Hindu samaj Protest : सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक; शहरात पोलिसांचा फौजफाटा

Continues below advertisement

Nashik Sakal Hindu samaj Protest : सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक; शहरात पोलिसांचा फौजफाटा

ही बातमी पण वाचा

Ramgiri Maharaj : आमचा उद्देश हिंदूंनी संघटित राहावं, परिणामांना सामोरं जाण्यास तयार; महंत रामगिरी महाराजांची पहिली प्रतिक्रिया

नाशिक : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहेत. या घटनेचे नाशिकसह छत्रपती संभाजीनगर येथे उमटले. महंत रामगिरी महाराज यांच्यावर नाशिकच्या येवला शहर पोलीस स्थानकात (Yeola Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता या प्रकरणावर महंत रामगिरी महाराज यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

महंत रामगिरी महाराज म्हणाले की, 177 वर्षांपूर्वी या सप्ताहाला सुरुवात झाली होती. 20 ते 25 लाख लोक येथे येतात. अखंड भजनात तल्लीन होतात. लोकांना भक्ती मार्गाला लावण्यासाठी या सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही करतो. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. एक ते दीड कोटी लोक बॉर्डरवर उभे आहेत. भारतामध्ये प्रवेश मागत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना आम्ही सांगितले हिंदूंनी मजबूत राहिले पाहिजे. अन्यायाला प्रतिकार केला पाहिजे.

परिणामांना सामोरे जाण्याची आमची तयारी 

आमचा त्यामागचा उद्देश एकच होता की हिंदूंनी संघटित राहावे. आम्ही जे वक्तव्य केले त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. आमच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर नोटीस येईल तेव्हा आम्ही बघू. आता सप्ताह सुरु आहे. आम्ही हा सप्ताह झाल्यानंतर पुढे बघू, अशी प्रतिक्रिया महंत रामगिरी महाराजांनी यावेळी दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram