Nashik : लसीकरण झालं असेल तरच रेशन मिळणार, नाशकात सोमवारपासून पहिली ते आठवीच्या शाळाही बंद
मुंबई, ठाणे, पुणे पाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातही शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. येत्या सोमवारपासून नाशिक जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शाळा आणि अकरावीचे वर्ग ३१ जानेवारीपर्यंत बंद असणार आहेत.पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनासोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. तसेच नाशिककारांनी लशीचे दोन्ही डोस घेतलेले नसल्यास त्यांचं रेशन बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी ८ दिवसांची मुदत देण्यात आलीय. त्यानंतरही लशीचे दोन्ही डोस न घेतल्यास रेशन बंद करण्यात येणार आहे.