Nashik Shreeram Statue : सर्वात उंच श्रीरामाच्या मुर्तीचं लोकार्पण

Continues below advertisement

Nashik Shreeram Statue : सर्वात उंच श्रीरामाच्या मुर्तीचं लोकार्पण

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास अवघे काही तास उरले असताना गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत तब्बल 38 निर्णय घेण्यात आले असून काही नव्याने महामंडळ स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली होती. ही विधानसभा निवडणुकीपूर्वीची (Vidhansabha Election 2024) मंत्रिमंडळाची शेवटची बैठक मानली जात आहे.   मात्र, या बैठकीला (Cabinet Meeting) सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उठून गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

एका इंग्रजी दैनिकाच्या माहितीनुसार, अजित पवार या बैठकीत जेमतेम 10 मिनिटं बसले. उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीतून लगेच निघून गेले. त्यानंतर तब्बल दोन ते अडीच तास ही बैठक सुरु होती. या बैठकीत तब्बल 38 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यापैकी बहुतांश निर्णय हे राज्याच्या आर्थिक तिजोरीवर भार टाकणारे होते. परंतु, हे निर्णय घेतले जात असताना अर्थमंत्री अजित पवार हेच या बैठकीला उपस्थित नव्हते. याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेवटपर्यंत मंत्रिमंडळाच्या या बैठकीत उपस्थित होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram