Nashik Police : पोलिसांची दारु पार्टी, सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद : ABP Majha
Continues below advertisement
दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाणं गाठावं... तर पोलिसच दोन तीन पेग मारून टाईट झालेले सापडावेत... हा अनुभव आहे नाशिककरांचा.... दारु पिऊन परिसरात धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांची तक्रार करण्यासाठी नाशिककरांनी गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी. के. नगर पोलीस चौकी गाठली.. तर तिथे पोलीसच दारुची पार्टी झोडत होते... हा सगळा प्रकार स्थानिकांनी त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय.. मोबाईल शूटिंग सुरु होताच पोलिसांना धूम ठोकण्याशिवाय कोणता पर्याय उरला नाही.. मद्यधुंद अवस्थेतील पोलिसांनी एका नागरिकाला मारहण केल्याचा देखील आरोप होतो. आता या दारूड्या पोलिसांवर काय कारवाई होते हे पाहावं लागेल...
Continues below advertisement