Nashik : 'बेशिस्त रिक्षाचालकांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार', पोलीस उपायुक्त किशोर काळेंची माहिती

Continues below advertisement
नाशिकमध्ये (Nashik) वाढती गुन्हेगारी आणि बेशिस्त रिक्षाचालकांच्या मुजोरीवर अंकुश लावण्यासाठी आता पोलीस प्रशासन सक्रिय झाले आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी 'ऑटो शिस्त मोहीम' राबवण्याचा निर्णय घेतला असून, पोलीस उपायुक्त किशोर काळे (Kishore Kale) यांनी या कारवाईची माहिती दिली. 'बेशिस्त आणि नियमबाह्य रिक्षाचालकांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करत कारवाई केली जाणार आहे,' असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या मोहिमेअंतर्गत गणवेश, बॅच, लायसन्स आणि रिक्षाची कागदपत्रे नसणे, तसेच प्रवाशांशी अरेरावी करून धोकादायक पद्धतीने रिक्षा चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई नाशिक शहरातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत राबवण्यात येणार असून, नियम मोडणारे रिक्षाचालक पोलिसांच्या रडारवर आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola