MVA - MNS Morcha : मतदार याद्यांवरून मविआ-मनसेचा सरकारविरोधात 'सत्त्याचा मोर्चा'
Continues below advertisement
मतदार याद्यांमधल्या (Voter Lists) घोळाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) यांनी राज्य सरकार (State Government) आणि निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) संघर्षाची तयारी सुरू केली आहे. 'न भूतो न भविष्यति असा मोर्चा होईल, असं नियोजन करा', अशा थेट सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, येत्या १ नोव्हेंबरला मुंबईत (Mumbai) 'सत्तेचा मोर्चा' या नावाने एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक बैठकांनंतर या मोर्चाचा मार्ग निश्चित झाला असून, हा मोर्चा फॅशन स्ट्रीटवरून (Fashion Street) निघून मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयावर धडकणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी मविआ आणि मनसे नेत्यांनी आझाद मैदानाची (Azad Maidan) पाहणी देखील केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement