Onion Crisis: 'सरकार मायबाप सरकार, मदत करा', Nashik मधील कांदा उत्पादक शेतकऱ्याची आर्त हाक
Continues below advertisement
नाशिकमधील (Nashik) कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) अतिवृष्टी आणि कमी भावामुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. मालेगाव तालुक्यातील दाभाडी गावात तर परिस्थिती अत्यंत बिकट असून, दिवाळीसाठी (Diwali) साठवलेला कांदा चाळीतच सडून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 'सरकार मायबाप सरकार शेतकऱ्यांना काहीतरी मदत करा,' अशी मागणी एका शेतकऱ्याने एबीपी माझाशी बोलताना केली आहे. अतिवृष्टीमुळे आधीच खरीप मक्याचे पीक वाया गेले आणि आता कांद्यालाही कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच बाजार समित्यांमधील लिलाव बंद असल्याने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. दिवाळीचा सण तोंडावर असताना शेतकऱ्यांपुढे मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement