Nashik Godavari : रामतीर्थ समितीकडून गोदावरी नदीची स्वच्छता; रामकुंड - रामसेतू परिसरात मोहिम
Continues below advertisement
गोदा आरतीवरून सध्या पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्यामध्ये वाद सुरू असतांनाच आज सकाळी याच रामतीर्थ समितीच्या वतीने गोदावरी नदीची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. रामकुंड, दुतोंडया मारुती परिसर, रामसेतू या सर्व परिसराची समितीच्या सदस्यांच्या वतीने साफसफाई करण्यात आली. यावेळी एस्कॉन तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधकही उपस्थित होते. नदी प्रदूषण मुक्त करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याने आता अशाप्रकारे विविध धार्मिक संस्था पुढे येत असल्याचं बघायला मिळत आहे.
Continues below advertisement