Mahapalika Mahasangram Nashik : महापालिकेचा महासंग्राम, नाशिक महापालिकेची स्थिती काय?

Continues below advertisement
नाशिकमध्ये (Nashik) नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमधील असंतोष शिगेला पोहोचला आहे. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भारत दिघोळे (Bharat Dighole) आणि प्रहार संघटनेचे अनिल भडांगे (Anil Bhadange) यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली आहे. 'शेतकऱ्यांवर कर्ज झाल्यानंतर हे निर्लज्ज सरकार बँकांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव करत आहे,' असा गंभीर आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देऊनही ते पाळले नाही, असा दावा आंदोलकांनी केला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदतही वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी संतापले आहेत. नाशिक जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांवर जमिनीच्या लिलावाची टांगती तलवार असल्याचे चित्र आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रस्थापित राजकारण्यांना नाकारून नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचे आवाहन केले जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola