Nashik : नाशकात नेत्यांचा मुलांचा विवाह सोहळा,सत्ताधाऱ्यांना पडला कोरोना नियमांचा विसर : ABP Majha

Continues below advertisement

एकीकडे राज्यावर निर्बंधांचं सावट आहे,  मात्र दुसरीकडे लोकप्रतिनिधीच सरकारने घालून दिलेल्या नियमांना पायदळी तुडवताना दिसून येतंय. राज्यात असे एकदोन नव्हे तर चार सोहळे गेल्या दोन दिवसांत समोर आलेत. नाशिकमध्ये बुधवारी सायंकाळी कन्नड विधानसभेचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला. तर नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या मुलीचा विवाह सोहळा गंगापूर रोडवरील गीता लॉन्समध्ये पार पडला. या दोन्ही सोहळ्याना वऱ्हाडी मंडळी आणि नेतेमंडळीनी तुफान गर्दी केली होती. शिवसेना खासदार संजय राऊत, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे देखिल या सोहळ्यात उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर यावेळी मास्कही नव्हते. तर तिकडे भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यातही नियमांचा बोजवारा उडाला.विशेष म्हणजे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यासह अनेक नेते सुद्धा विनामस्क उपस्थित होते. तर तिकडे पनवेलमध्ये उपमहापौरांच्या वाढदिवसाला कोरोना नियम पायदळी तुडवले गेले भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत ही सर्व नियमांची पायल्ली झाली.  आणि हे सर्व दृश्य बघून नियम फक्त सामान्य जनतेसाठीच मर्यादित आहेत का ? असा प्रश्न विचारला जातोय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram