Mahapalikech Mahasangram Nashik : 'मूलभूत प्रश्न सोडवा', Nashik करांचा कौल कोणाला?
Continues below advertisement
नाशिकमध्ये आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना, 'नगर महापालिकाचा महासंग्राम' या विशेष कार्यक्रमात नाशिककरांच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. अनेक वर्षांपासून महापालिकेवर प्रशासक राजवट असल्याने नागरिकांनी मूलभूत सुविधांच्या (रस्ते, पाणी, वीज) अभावावर तीव्र नाराजी व्यक्त केली. वाढती गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाचे मुद्देही चर्चेत आले, विशेषतः २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासाची गरज अधोरेखित करण्यात आली. 'कुठलं पक्ष न पाहता जो चांगला उमेदवार आहे त्याला निवडून आणायचं, कारण शेवटी पब्लिकलाच त्रास सहन करावा लागतो,' असे मत एका नागरिकाने व्यक्त केले. पोलिसांनी गुन्हेगारीवर सुरू केलेली कारवाई कायमस्वरूपी सुरू राहावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement