NCP Alliance: 'Supriya Sule यांनी युतीचा प्रस्ताव दिला', Ajit Pawar गटाचे Yogesh Behl यांचा दावा

Continues below advertisement
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या (PCMC Elections) पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांमध्ये युतीची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल (Yogesh Behl) यांनी दावा केला आहे की, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी युतीचा प्रस्ताव दिला असून, स्वतः अजित पवार यावर शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करणार आहेत. 'दादा म्हटले त्याबद्दलच्या अजून अंतिम बोलण्या व्हायच्या आहेत, परंतु तसा विचार चालू आहे,' असे योगेश बहल यांनी सांगितले. दुसरीकडे, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे (Tushar Kamthe) यांनी म्हटले आहे की, भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी ते अजित पवार गटासोबत जाण्यास तयार आहेत, पण त्यासाठी अजित पवार गटाने भाजपचे विचार सोडावेत. या संभाव्य आघाडीमुळे काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola