Naseem Khan On One Nation One Election : महाराष्ट्राची निवडणूक आली म्हणून खोडा घालण्याचा प्रयत्न

Continues below advertisement

नवी दिल्ली: निश्चलनीकरण, सर्जिकल स्ट्राईक, कलम 370 रद्द करणे यासारख्या मोदी सरकारच्या धक्कातंत्राच्या मालिकेत आणखी एका निर्णयाची भर पडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या महत्त्वाकांक्षी धोरणांपैकी एक असणाऱ्या 'एक देश, एक निवडणूक' (One Nation One Election) धोरणाची देशात अंमलबजावणी होण्याच्यादृष्टीने पहिले पाऊल पडले आहे. कारण केंद्रीय मंत्रिमंडळाने One Nation One Election या धोरणाला मंजुरी दिल्याची माहिती आहे. एक देश एक निवडणूक धोरणामुळे भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता आहे. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. त्यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना म्हटले की, एक देश एक निवडणूक हा विषय फार पूर्वीपासून पंतप्रधान मोदी यांनी मांडला आहे. देशाच्या लोकशाहीचे आरोग्य टिकवण्यासाठी आणि प्रशासनाची सुशासन देण्याची क्षमता वाढवण्याच्यादृष्टीने 'एक देश एक निवडणूक' (One Nation One Election) हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरेल. माझं तर म्हणणं आहे की, धिस विल बी मदर ऑफ ऑल पॉलिटिकल रिफॉर्मस, सर्व राजकीय सुधारणांची जननी 'एक देश एक निवडणूक' ही पद्धत आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने निर्णय घेतला असेल तर ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram