Maharashtra : Narhari Zirwal भाजपच्या मताशी सहमत, नवाब मलिकांविरुध्द स्वाक्षरी मोहीमेत केली सही
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं स्वाक्षरी मोहीम सुरु केली. विधानभवनाच्या परिसरात भाजपच्या आमदारांनी आंदोलन केलं आणि एका फलकावर त्यासाठी सह्या केल्या. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचं आगमन झालं तेव्हा भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांच्या हातात पेन दिला. मग झिरवाळ यांनीही सही करून टाकली. झिरवाळ हे नवाब मलिक यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत. त्यामुळे भाजपनं मलिक यांच्या राजीनाम्यासाठी सुरु केलेल्या स्वाक्षरी मोहिमेत झिरवाळ यांनी सही केल्यानं तो चर्चेचा विषय ठरला....
Tags :
ABP Majha LIVE ABP Maza Nawab Malik Jitendra Awhad Abp Maza Live Abp Maza Marathi Live Narhari Jhirwal