Nawab Malik : भाजपच्या बर्डावर राष्ट्रवादीची स्वाक्षरी, झिरवाळ फसले भाजपच्या जाळ्यात?

Continues below advertisement

Maharashtra Budget Session LIVE:  आज विधानभवनात भाजपाच्या वतीने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहीम राबवली गेली. यावेळी भाजपच्या आमदारांनी स्वाक्षरी केल्या. मात्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी देखील यावर स्वाक्षरी केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. झालं असं की, विधानभवनाच्या पायऱ्यांच्या शेजारी असलेल्या डायसवर भाजप नेते आपल्या सह्या करत होते. यावेळी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ तिथं आले. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी नरहरी झिरवाळ यांना सही करण्यासाठी पेन दिला आणि त्यांनी सही केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram