
Ahilyanagar Leopard Rescue : 80 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला 'असं' केलं रेस्क्यू!
Ahilyanagar Leopard Rescue : 80 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला 'असं' केलं रेस्क्यू!
अहिल्यानगर तालुक्यातील निमगाव वाघा परिसरातील उधार वस्ती परिसरात भक्षाच्या शोधत निघालेल्या बिबट्या 80 फूट खोल विहिरीत पडला... याबाबत माहिती समजताच ग्रामस्थ आणि वनविभागाच्या अथक प्रयत्नानंतर दीड तासात बिबट्याला विहिरीबाहेर काढून जेरबंद करण्यात यश आल आहे... निमगाव वाघा परिसरात दोन दिवसांपासून डोंगरे मळा परिसरात बिबट्याची चाहूल ग्रामस्थांना लागली होती... काल दुपारी बारा वाजण्याची सुमारास विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी संतोष उधार यांचे कुटुंबीय गेले होते...मात्र मोटार सुरू न झाल्याने त्यांनी विहिरीमध्ये सहज पाहिले त्यावेळी त्यांना विहिरीमध्ये बिबट्या आढळून आला... त्यांनी तात्काळ वन विभागाला याची माहिती दिली... विहिरीच्या चारही बाजूने दोर बांधून विहिरीमध्ये पलंग खाली सोडण्यात आणि बिबट्याला पलंगावरती घेण्यात आले... त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणलेला पिंजरा विहिरीमध्ये सोडला आणि दीड तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.