Morbi bridge collapse : Narendra Modi मोरबी दौऱ्यावर, मोरबी दुर्घटनेतील जखमींची करणार विचारपूस
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मोरबी दौऱ्यावर जाणार आहेत.... या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांची मोदी रुग्णालयात जाऊन भेट घेणार आहेत.. मात्र मोदींच्या या दौऱ्याआधी रुग्णालयात रंगरंगोटी करण्यात येतेय.. या संदर्भातील व्हीडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झालेत.. याच मुद्यावरुन विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधलाय.. काँग्रेसने याला शोकांतिका म्हटलंय. तर आम आदमी पक्षाने ही भाजपच्या फोटोशूटपूर्वीची तयारी असल्याचे म्हटलंय. मोरबी पूल दुर्घटनेत १३६ जणांचा मृत्यू झालाय.