Narayan Rane on ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणार
एसटीच्या संपाच्या प्रश्नावरून केंद्रीय नारायण राणे यांनी राज्यपालांकडे हा विषय दया आम्ही तोडगा काढू असं म्हणत वेळ पडल्यास राज्याच्या परिवहन मंत्र्याशी बोलू अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्गात दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत एसटीचा विषय येतो. एसटीचा संप पंधरा दिवस आणि एसटी कर्मचाऱ्यांनी जवळपास 40 लोकांनी आत्महत्या केली. भयावह परिस्थिती एसटी कर्मचाऱ्यांच्या घरी आहे. अस असताना राज्य सरकार ज्या प्रकारे खेळवतय, या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. एसटी कर्मचाऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न जरा गांभीर्याने घेत नसताना केंद्र सरकारने सरळ महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यावेत कि प्रश्न त्वरित मिटवा. अन्यथा राज्यपालांकडे आम्ही हे अधिकार देऊ. आम्ही जो मार्ग काढायचा आहे, त्याबद्दल मी स्वतः अमित शहांशी आणि पंतप्रधानांशी बोलेन यातून मार्ग लवकरच काढावा आणि कर्मचाऱ्यांना वाचवावं एवढ मी सांगेन. तसचं राज्यात जे कोण परिवहन मंत्री आहेत कर्मचाऱ्यांच्या हितासाठी मी त्यांच्याशी सुद्धा बोलेन हे आता बंद करा हट्ट आणि तुम्ही न्याय देण्याच्या दृष्टीने चर्चेला लागा. हे मी त्यांना पण सांगेन.