Maharashtra Politics: '...युती झाली तर संबंध तोडू', Narayan Rane यांचा थेट इशारा, Konkan मध्ये राजकीय भूकंप
Continues below advertisement
कोकणातील (Konkan) कणकवलीतील (Kankavli) राजकारण तापलं असून स्थानिक निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या संभाव्य युतीच्या प्रस्तावामुळे राजकीय वादळ निर्माण झालं आहे. ही युती झाल्यास शिंदे गटासोबत असलेले संबंध तोडू, असा थेट इशारा भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिला आहे. शिवसेनेचे माजी आमदार राजन तेली (Rajan Teli) यांनी हा प्रस्ताव दिल्याची चर्चा होती, ज्याला त्यांनी दुजोराही दिला होता. मात्र, राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी आमची शिवसेना ठाकरेंच्या सोबत जाणार नाही, असं स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. हा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल आणि निलेश राणे (Nilesh Rane) व उदय सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी बोलून अंतिम निर्णय घेतील, असेही सांगण्यात येत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement