Land Scam Allegation: ‘मी ३ कोटींत २०० कोटींची जमीन घेतली? मलाच माहिती नाही!’- Pratap Sarnaik

Continues below advertisement
राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेले गंभीर आरोप फेटाळले आहेत. वडेट्टीवार यांनी सरनाईकांवर २०० कोटी रुपयांची जमीन केवळ ३ कोटी रुपयांत घेतल्याचा आरोप केला होता. यावर प्रतिक्रिया देताना सरनाईक म्हणाले, 'मी तीन कोटी घेतली आणि मलाच माहिती नाही, दोनशे कोटी त्याची व्हॅल्यू आहे, मी शोधा खूश झालो की एवढ्या स्वस्तामध्ये जमीन मला मिळाली असेल तर'. राज्याचा मंत्री म्हणून माझ्यावर झालेल्या गंभीर आरोपांना उत्तर देणे हे माझे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले. विजय वडेट्टीवार पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असून, त्यांनी कागदोपत्री पुरावे सादर केल्यानंतरच आपण सविस्तर खुलासा करू, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. सध्या तरी अशा प्रकारची कोणतीही जमीन आपल्या नावावर असल्याचे आठवत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola