Narayan Rane UNCUT : सरकार ते पत्रकार, नारायण राणेंचा हल्लाबोल

Narayan Rane : राज्यातील पेपर फुटी प्रकरणावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. महाविकास आघाडी सरकार म्हणजे सावळा गोंधळ असल्याची टीका नारायण राणे यांनी आज सिंधुदुर्ग येथे केली. महाविकास आघाडी सरकार गेली दोन वर्षात केवळ निवडणुका, पक्षबांधणीसाठी मंत्रालयात बैठका घेत आहेत. त्या बैठकांमध्ये मुख्यमंत्री मंत्रालयात आलेच नाहीत. त्यामुळे त्यांचा प्रशासनावर वचक नसून ते घरी आयसीयुमध्ये बसून आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. जैतापूरच्या मुद्यावर बोलताना राणे यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी बोलून उत्तर देईन असं उत्तर दिलं. तर खासदाराचं नाव ऐकलं तरी वीट येत असल्याचं राणे यांनी मेडिकल कॉलेजच्या प्रश्नाला उत्तर दिलं.  दापोलीत काय चाललंय या आल्तु - फाल्तु प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नसल्याचं राणेंनी म्हटलं.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola