Narayan Rane Speech Kudal : 20 वर्षांनी राणे शिवसेनेच्या मंचावर, नारायण राणेंचं झंझावाती भाषण

Continues below advertisement

Narayan Rane Speech Kudal : 20 वर्षांनी राणे शिवसेनेच्या मंचावर, नारायण राणेंचं झंझावाती भाषण
दोडामार्ग मध्ये १३०० एकर जागा युगासाठी राखीव ठेवली, ओरोस मध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू केलं  देशात हॉस्पिटल मध्ये लागणारे मशीन बनवण्याचे कारखाने दोडामार्ग मध्ये सुरू होतील. टँकर मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा नारायण राणे यांनी केला. उद्धव ठाकरे यांना काय माहिती आहे, एखादा तरी उद्योग, शाळा, पाच पंचवीस लोकांना कामाला लावायच काम केलं का? नारायण राणे आणि कुटुंबीय त्यांचं टार्गेट,  काल परवा गेलेले राजन तेली आणि परशुराम उपरकर माझ्यावर टीका करतात. राणे आले नसतील तर हेही नसते. हे फक्त दलाली करतात. राजन तेली यांना bkc मध्ये बंगला कोणी दिला विचारा, त्याची काय लायकी, त्याला आमदार केला. त्याला राणेंनी खर्च करून आमदार केला. मी त्यांची दखल घेत नाही, त्यांची माझी बरोबरी करायची लायकी नाही गेली १० वर्ष विधानसभेत काय बोलला नाही, जाडजूड बघून लोक निवडून देत असतील तर माझी हरकत नाही. दुसऱ्याच्या नावावर कॉन्ट्रॅक्ट घ्यायची काम करत आहे. बाळासाहेबांनी मला सिंधुदुर्गात येऊन काम करायला सांगितलं. त्यामुळे निवडणूक लढवली. उबाठा की फुबाठा उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा उल्लेख. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्रंदिवस काम करत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन तास काम करायचे, कोरोना मध्ये टक्केवारी खायचं यांचं काम. लाडकी बहीण योजना १५०० रुपये मिळत आहेत, एकनाथ शिंदे गरिबांसाठी ही योजना सुरू केली. मात्र उद्धव ठाकरे यांनी एक तरी योजना आणली का? ही योजना बंद करणार असं दसरा मेळाव्यात भाषण करता वैभव नाईक गेली १० वर्ष गल्लीतच आहेत.  कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचा विकास करायचा असल्यास निलेश राणे यांना निवडून द्यावं लागेल. राजन तेली शेंबडा, उद्धव ठाकरे महाशेंबडा मुंबईत शिवसेनेची ताकद, नाव आणि दहशत निर्माण केली ती नारायण राणे यांच्यासारख्या सैनिकांमुळे, आम्ही नसतो तर उद्वव ठाकरे नसता. आता उद्धव ठाकरे केव्हाही मुख्यमंत्री होणार नाही आणि त्यांचे २५ आमदार देखील निवडून येणार नाही. कॉन्ट्रॅक्ट च्या जीवावर जगणारे परशुराम उपरकर यांनी जिल्हात काय केलं. उद्धव ठाकरे लायक होता तर बाळासाहेबांनी त्याला मुख्यमंत्री का केलं नाही. मुख्यमंत्री दारात आलेत जाऊ नका अशी लोकांना विनंती राणेंनी केलीय. कोण अंगावर आलं तर आम्ही सहन करत नाही हा आमचा वाईट गुण आहे. राणे मध्ये कर्तुत्व असल्याने तिघांनाही उमेदवारी मिळते.  चुगल्या, दलाली करून आम्ही उमेदवारी घेत नाही, राजन तेली आणि परशुराम उपरकर यांनी हेच केलं माझा पराभव कुडाळ मालवण मतदारसंघात का पराभव झाला माहिती नाही, या मतदारसंघात काम केलं. माझ्या कामाची आठवण करून माझ्या मुलाला मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्यास मी तुमचा आभारी राहीन.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram