Maharashtra Politics: 'उद्धव ठाकरे म्हणजे राजकारणाचं विकृत व्यक्तीमत्व', Narayan Rane यांची जहरी टीका

Continues below advertisement
भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरे बंधूंवर (Thackeray Brothers) जोरदार टीका केली आहे, ज्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. 'उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणजे राजकारणाचं विकृत व्यक्तीमत्व,' अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. EVM आणि मतदार यादीतील गोंधळाच्या आरोपांवरून राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसे (MNS) द्वारे आयोजित 'सत्याचा मोर्चा' (Satya Cha Morcha) संदर्भातही राणेंनी भाष्य केले. 'राज ठाकरे आझाद मैदानात (Azad Maidan) मावतील एवढी तरी माणसं नेतील का?' असा खोचक टोला लगावत त्यांनी मोर्चाच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. राणेंच्या या दुहेरी हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola