Zero Hour : 'खापरी परिसरात सरकारकडून चर्चेसाठी शिष्टमंडळ दाखल,पोलिसांचा चोख बंदोबस्त

Continues below advertisement
नागपुरात (Nagpur) बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस अत्यंत नाट्यमय ठरला. 'सरकार आमचं आंदोलन कोर्टाच्या निर्णयाच्या माध्यमातून दडपतंय', असा आरोप आंदोलकांनी केला आहे. कर्जमाफीसह (Farm Loan Waiver) २२ मागण्यांसाठी हजारो शेतकरी नागपूरच्या वेशीवर पोहोचले असून, बच्चू कडू यांनी स्वतःला अटक करवून घेण्याची भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे, सरकारनं चर्चेसाठी मंत्री आशिष जैस्वाल (Ashish Jaiswal) आणि पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांचं शिष्टमंडळ पाठवलं आहे, जे आंदोलकांच्या भेटीसाठी रस्त्यावर प्रतीक्षा करत आहेत. आंदोलक आणि पोलीस समोरासमोर आले असले तरी पोलिसांनी संयमाची भूमिका घेतल्याचं चित्र आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आंदोलक काहीसे नाराज झाले असले, तरी चर्चेतून तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola