Narayan Rane: दिशा सॅलियनच्या आईनं दिलेल्या तक्रारीनंतर राणेंची पोलीस चौकशी ABP Majha
Continues below advertisement
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी दिशी सॅलियनबाबत केलेल्या वक्तव्यावर आज मुंबई पोलिसांकडून चौकशी होणार आहे. दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याची तक्रार दिशा सॅलियनच्या आईनं केली होती. या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी राणे पितापुत्रांना चौकशीसाठी बोलावलं आहे. या प्रकरणी दिंडोशी कोर्टानं राणेंना १० मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे. आज दुपारी राणे पितापुत्रांना मालवणी पोलीस ठाण्यात हजर राहायचं आहे.
Continues below advertisement