
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 22 March 2025
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 22 March 2025
तर दंगेखोरांची संपत्ती जप्त करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा, सोशल मीडियावर पोस्ट टाकणारेही सहआरोपी
कुराणातली आयत लिहिलेली चादर जाळल्याची अफवा पसरली, सोशल मीडियातून अपप्रचार झाल्याने जमाव जमला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
आदित्य ठाकरेंचा दावा मूर्खपणाचा, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल...नागपूरमधला हिंसाचार देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी, माझा व्हिजनमध्ये बोलताना आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला होता संशय
नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी, जखमी इरफान अन्सारी यांचा मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
काँग्रेसच्या सत्यशोधन समितीने घेतला नागपूर हिंसाचाराचा आढावा...कुराणातील आयत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंची मागणी...
नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी १४ जणांना अटक, अटक केलेल्यांची संख्या आता १०५ वर, १० गुन्ह्यांत १२०० हून अधिक दंगेखोरांविरुद्ध गुन्हे दाखल..