Narayan Rane आणि Milind Narvekar यांच्यात ट्विटर वॉर, एकमेकांवर हल्लाबोल

Continues below advertisement

मुंबई : राज्यातील दोन नेते सध्या ट्विटरवर एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर  यांच्यात ट्विटरवर चांगलेच शाब्दिक 'वॉर' रंगले आहे.  या वादाची ठिणगी पडली ती नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदे  शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांवर टीकास्त्र सोडलंय. त्यानंतर नार्वेकर आणि राणे यांच्यात ट्विटरवॉर पाहायला मिळत आहे.

बुधवारी नारायण राणेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पूर्वी  नार्वेकर हे मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे  असे म्हणाले. बेल मारली की येस सर… काय आणू? असं म्हणणारे आता नेते बनले, अशा शब्दात राणेंनी मिलिंद नार्वेकरांची खिल्ली उडवली. यावर मिलिंद नार्वेकरांनी ट्वीट करत नारायण राणेंच्या मेमरीची घंटी वाजवली आहे. मिलिंद नार्वेकर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात का ? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram