खारेपाटण ते सावंतवाडी.. महाराष्ट्राचं लक्ष, Sindhudurg मध्ये राणे-शिवसेना वाद आणखी पेटणार?

मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा केल्यानंतर नारायण राणे आणि शिवसेनेत जोरदार घमासान सुरु आहे आणि हे युद्ध जिंकण्यासाठी नारायण राणेंनी आता भात्यात राखून ठेवलेले बाण बाहेर काढायला सुरुवात केली. जनआशीर्वाद यात्रेचा रथ घेऊन रत्नागिरीत पोहोचलेल्या राणेंनी मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली. आपल्या वहिनीवरती अॅसिड फेकायला कुणी सांगितलं होतं हे मला माहिती आहे, असं वक्तव्य करत राणेंनी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मात्र हे वक्तव्य करताना राणेंनी ना कुणाचं नाव घेतलं, नाही तपशील उघड केला. टप्प्य़ाटप्यानं जुनी प्रकरणं बाहेर काढण्याचा इशारा राणेंनी दिला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola