ABP News

Narayan Rane Full PC : राज्यात दंगली होऊ शकतात असं म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना अटक करा

Continues below advertisement

पुणे : राज्यात दंगली होऊ शकतात असं म्हणणारे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, अशी मागणी केंद्रीय लघू सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली. ते पुण्यात (Pune) पत्रकार परिषदेत बोलत होते. 

 प्रकाश आंबेडकर म्हणतात दंगली होऊ शकतात. खरंच राज्यात अशी परिस्थिती आहे का? असा प्रश्न नारायण राणे यांना विचारण्यात आला. त्यावर राणे म्हणाले, "त्यांच्यावर FIR दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे. त्यांना अटक करायला पाहिजे आणि माहिती घ्यायला पाहिजे. दंगलीचा आधार सांगा".

नारायण राणे यांना पुन्हा त्याबाबतच विचारण्या आलं. त्यावर त्यांनी सावरासावरव केली. आंबेडकर असो किंवा इतर कोणीही, दंगलीविषयी बोलत असेल तर, पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घ्यायला हवी. त्यांची चौकशी करायला हवी. दंगली रोखण्यासाठी कारवाई करायला हवी, असं नारायण राणे म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram