Narayan Rane on Thackeray : मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार, नारायण राणे यांचा गौप्यस्फोट
Continues below advertisement
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या बंगल्यातील बांधकामाची तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. यावरुन राणे कुटुंबाकडून शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. स्वत: नारायण राणे यांनी ट्विट करत शिवसेनेच्या नेत्यांच्या घरी ईडीची धाड पडणार असल्याचा इशारा दिला आहे.
Continues below advertisement