Disha Salian : नारायण राणेंच्या अडचणी वाढणार?दिशाची बदनामी केल्याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे..कारण सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर राहिलेल्या दिशा सालियनची बदनामी केल्याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगानं दिले आहेत...
48 तासात अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबईतल्या मालवणी पोलिसांना देण्यात आले आहेत..दिशा सालियनची हत्या झाल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला होता..
पोलिसांच्या अहवालानंतरही आणि पोस्टमार्टेम रिपोर्टनंतरही राणेंनी आरोप करुन दिशा सालियनची बदनामी केल्याची तक्रार किशोरी पेडणेकर यांनी केली होती..अखेर राज्य महिला आयोगानं या प्रकरणात लक्ष घातलंय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola