Nandurbar : सातपुड्यात होळीची उत्साह, डोंगररांगांमध्ये 7 दिवस होळीची धुम
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजपासून सुरू होणाऱ्या होळी उत्सवामुळे सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये चैतन्याचे वातावरण पाहण्यास मिळत आहे कोरोना मुळे गेल्या दोन वर्षापासून आदिवासी संस्कृतीतील सर्वात महत्वाचा सण असलेल्या होळीच्या सणावर निर्बंध आले होते मात्र कोरोणा स्थिती नियंत्रणात आल्यानंतर आज या वर्षी सातपुड्यातील होळी सण होणार असल्याने सर्वत्र चैतन्य दिसून येत आहे सातपुड्याच्या डोंगर रंगामध्ये आज पासून सातदिवस होळीची धूम असणार आहे. त्यात काठी येथे होणाऱ्या राजवाडी होळी ला विशेष महत्व आहे.रात्री होणाऱ्या या होळी साठी देशभरातून पर्यटक हजेरी लावणार आहेत विशेष म्हणजे होळीचे नवस फेडण्यासाठी आदिवासी बांधव वेगवेगळ्या वेशभूषा करून रात्रभर होळी जवळ आदिवासी नृत्य सादर करत असतात सकाळपासूनच सातपुड्याच्या डोंगर रांगांमधून पायपीट करत काठी येथे पोहोचत असतात डोक्यावर मोरपिसांचा टोप असणाऱ्या व्यक्तीला मोरक्या असे म्हटले जाते कमरेला दुधडी बांधलेल्या ना बुद्या म्हणतात तर कमरेला भुरू असलेला बावा असतो ज्या पुरुषांनी महिलेचे सोंग घेतलेले असते त्याला ढानकाडोकोअसे म्हणतात. अश्या विविध वेशभूषा केलेल्या आदिवासी बांधव सकाळपासूनच सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये लक्ष वेधून घेत आहेत.