Nandurbar Eggs: अंड्यांच्या कमी दरामुळे व्यावसायीक अडचणीत ABP Majha

Continues below advertisement

हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात अंड्यांची मागणी वाढत असते त्यामुळे त्यांचे दरही वाढत असतात मात्र या वर्षी हिवाळ्यात अंड्यांचे दर तब्बल 75 पैशांनी कमी झाल्याने नवापूर मधील पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. अंड्यांचे दर कमी झाले असताना कोंबड्यांचे खाद्य महागल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी म्हणायची वेळ अंडी व्यापाऱ्यांवर आलीय. गुजरात राज्यात दररोज सात ते आठ लाख अंडी विक्रीसाठी जात असतात डिसेंबर महिन्यात अंड्यांचा प्रति नग दर 5 रुपये इतका होता, मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अंड्यांच्या दरात प्रति नग 75 पैशांनी दर कमी झाल्याने  पोल्ट्री मालकांना मोठा फटका बसला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram