Nanded: 'रेल्वेमार्गाचा निम्मा खर्च उचलण्याची राज्याची तयारी'- अशोक चव्हाण ABP Majha
Continues below advertisement
नांदेड आणि लातूरला थेट रेल्वे मार्गानं जोडण्याची मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणांनी केली. नायगावातील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत चव्हाण बोलत होते. नांदेड-लातूर रेल्वे मार्गाला मंजुरी द्या. त्यासाठी निम्मा खर्च उचलण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचं चव्हाणांनी म्हटलंय. आजच्या घडीला नांदेड-लातूर रस्ते मार्ग जवळपास १४४ किमी तर परभणी-परळीमार्गे रेल्वे मार्ग २१२ किमी अंतराचा आहे. त्यामुळे सरळ रेषेत जोडणारा रेल्वे मार्ग टाकल्यास नांदेड-लातूरचं अंतर साधारणत: १०० किमी असेल. त्यामुळे ताशी किमान १०० किमी वेगानं धावणारी रेल्वे जेमतेम सव्वा तासात नांदेडहून लातूरला पोहचवू शकेल. त्यामुळे रेल्वे प्रवासात अंतर कमी होऊन प्रवाशांचा वेळ आणि पैसाही वाचेल, असंही चव्हाणांनी म्हटलं.
Continues below advertisement
Tags :
Election Ashok Chavan Latur Demand Nanded Railways Public Works Minister Naigaon Nagar Panchayat Campaign Meeting