Nanded मधील शाळा आजपासून नाही तर 13 डिसेंबरपासून सुरू : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नांदेड जिल्ह्यातील शाळा 13 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ही माहिती दिलीय. 12 डिसेंबरपर्यंत लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाईल. त्यानंतर जिल्ह्यातील लसीकरणाच्या प्रमाणाचा आढावा घेऊन 13 डिसेंबरपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.