Nanded : नांदेडमधील गांजाचं नक्षल कनेक्शन? NIA चं पथक नांदेडमध्ये दाखल ABP Majha
१ हजार १२७ किलो गांजा पुरवठाप्रकरणी एनआयएचं पथक नांदेडमध्ये दाखल झालंय. नांदेडच्या नायगाव इथं हे पथक पोहोचलंय. एनआयएच्या पथकाने नक्षल फंडिंग संबंधांवरुन अटक केलेल्या दोन्ही आरोपींची चौकशी केलीय. आंध्र प्रदेशातील ड्रग्ज पुरवठ्याचा सूत्रधार अनिल टकलूच्या शोधात मुंबई एनसीबी पथकाने धुळ्यातील त्याच्या महत्त्वाच्या ठिकाणी छापे मारलेत. तरीही ड्रग्ज पुरवठादार फरार असून त्याचा एनसीबीकडून शोध सुरु आहे. तीन दिवसांपूर्वी मुंबई एनसीबीच्या टीमने नांदेडमधील मांजरम इथं ट्रकचा पाठलाग करत १ हजार १२७ किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती.